प्रवेश माहिती

  उत्कृष्ट सुविधा

प्रवेश प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या नियमांविषयी सविस्तर –

1. व्यसनमुक्ती केंद्रातील उपचाराचा कालावधी हा किमान 30 दिवसांचा राहील.

2.  प्रवेशित रुग्णास त्याच्या इतर आजारांसाठी बाहेरील हाॅस्पीटल अथवा वैदयकिय सेवा सुविधा लागल्यास ती वैयक्तिकरित्या करावी लागेल.

3. प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे सर्व अधिकार हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राने स्वतःकडे राखुन ठेवली आहेत.

4. रुग्ण  जर अल्कोहोल विथड्रॉल स्थितीमध्ये गेल्यास त्यासोबत नातेवाईकांनी राहण्याची आवश्यकता नाही परंतु जर गरज पडली तर नातेवाईकांना बोलवले असता त्यांनी वेळेवर येणे बंधनकारक राहील.

5. प्रवेश घेतेवेळी रुग्णाचे आधार कार्ड देणे बंधनकारक राहील.

 

दाखल करताना रुग्णासोबत द्यावयाचे सामान –

दोन पांढरे शर्ट / टी-शर्ट

दोन पायजमे, अंडरवेअर्स, बनियन्स, टॉवेल

अंगाचा व कपड्यांचा साबण, कंगवा, टूथपेस्ट, टूथब्रश मंजन, कंगवा, खोबरेल तेल, स्टिलचा ग्लास, ताट, ताटली, चादर, गरज पडल्यास गरम कपउे -स्वेटर, मफलर इ.

 

नातेवाईकांसाठी महत्त्वाच्या सूचना –

  1.  रुग्णमित्रास भेटण्यासाठी नातेवाईकांनी पुढील वेळेत यावे.
  2.  रविवार – सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत यावे 
  3. रुग्णास भेटण्यासाठी शक्यतो दोनच नातेवाईक व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल.
  4.  आमचे केंद्र संपुर्णपणे व्यसनमुक्तीसाठी काम करत असल्यामुळे नातेवाईकांनी येतांना व्यसन करुन येवु नये. उदा. अल्कोहोल, तंबाखु खाणे, सिगारेट, विडी, इ. व्यसन असल्यास त्यास प्रवेश मिळणार नाही.
  5. आपला रुग्ण व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्रासोबत कुटूंबियांनी साथ दिल्यास रुग्ण संपुर्णपणे चांगला होईल. व तो पुर्ववत आपल्या कुटूंबियांसोबत सोबत राहील.
  6. रुग्णांच्या नातेवाईकांनी दर रविवारी सकाळी 11 ते 1 वाजेच्या दरम्यान कौटुंबिक चर्चासत्रासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

     

    महत्वाची सुचना


    आंतररुग्ण मित्रास खालील वस्तू देण्यास सक्त मनाई आहे.
    1. अंमलीपदार्थ  2.पैसे/एटीएम कार्ड 3.मांसाहारी पदार्थ 4. शेवींग क्रिम, अथवा किट, 5.शहाळे  6. तबाखूजन्य पदार्थ,
    7. मोबाईल, लॅपटाॅप किंवा विजेवर चालणा-या वस्तू, 8. ब्लेड, कात्री, सुरी, व इतर हत्यार
    9. वैदयकिय अधिका-यांनी दिलेल्या औषधांव्यतिरिक्त इतर बाहेरील औषधे
    10. भाजकी/ सुगंधी सुपारी
    11. मौल्यवान वस्तू
    12. बाॅडी स्पे्र
    13. बाम, आयोडेक्स
    14. थंड पेय इ.

    केंद्र सरकार अंतर्गत ;(Ministry of Social Justice & Empowerment New Delhi) यांच्या मान्यतेने व ग्रामीण जनसेवा शिक्षण संस्थेच्या संयोगाने परिवर्तन व्यसनमुक्ती उपचार केंद्राची सुरुवात 2001 साली झाली. सन 2001 पासुन व्यसनाने त्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना मानसिक आजारातुन आणि शारिरीक, कौटुंबिक, आर्थिक इत्यादी समस्ेयतून बाहेर काढण्यास परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचा मोलाचा वाटा आहे.

     

 

 

Office Location

परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र,

प्लॉट नं. ३०, गायत्री नगर दत्त मंदिर चौक,

देवपूर धुळे-424005

Open Hours

M-F: 8am – 6pm, S-S, 9am – 1pm