परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र
व्यसन-:
व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की ज्यामुळे मोठया प्रमाणावर शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक हानी होत असल्याची जाणीव होत असुनही त्यातुन सुटण्याचा प्रयत्न करुनही त्याच मार्गाने जाणे म्हणजे व्यसन होय.
आपल्या देशातील युवा पिढी व्यसनात अडकत आहे. व्यसन हे एक विनाशकारी सवय आहे. हि सवय सध्या युवा पिढीत जास्त प्रमाणात आढळत आहे. आता तर शाळा काॅलेज, कार्यालये यामध्ये अनेक लोक तंबाखू, सिगारेट, दारु, गांजा, चरस, झोपेच्या गोळया अशा अनेक प्रकारच्या मादक पदार्थाने गुरफटले गेले आहेत. व्यसन म्हणजे एक मानसिक रोग आहे. एकदा जर शरीराला त्या मादक द्रव्याची सवय झाल्यास त्याच्याशिवाय तो जगुच शकत नाही असे त्यास वाटते. व त्या जाळयात तो स्वतःला अडकवून घेतो व वारंवार जाळयातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यातुन तो स्वतःची सुटका करु शकत नाही. त्यामुळे अशी अनेक कुटुंब व्यसनामुळे उध्वस्त झाली आहेत अनेकांचे संसार उघडयावर पडली आहेत हया वाईट सवयींन पासुन सुटका मिळण्यासाठी स्वत्ःची इच्छाशक्ती, योग्य मार्गदशन व औषेाधोपचार यांची साथ हवी असते.
व्यसनाधिनता कशी वाढीस लागते-:
एखादी व्यक्ती ही आपोआप व्यसनाधीन होत नसते. त्याला त्याचे कुटुंब, त्याचा आसपासचा परिसर, मित्रमंडळी, नातेवाईक आसपासची परिस्थीती कारणीभूत असते म्हणजेच व्यक्ती ही झटपट व्यसनी बनत नसुन ती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात मानसिक तनावामुळे होत असते. त्यामुळे सदर व्यक्तीचा स्वभाव बदलत असतो. सदर व्यक्ती चिडचिड करते, त्याचे कामात चित्त नसते, तर कधी गप्प रहातो. त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाची पातळी घसरते त्याच्या इच्छाशक्तीचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे कौटुंबीक कलह, कर्जबाजारीपणा अथवा एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाविरुध्द घडतात यामुळे भावनीक अस्थिरता निर्माण होतात व सदर व्यक्ती व्यसनाधिनतेचा वाटेने वाटचाल करायला लागते. मग ती व्यक्ती सार्वजनीक कार्यक्रम, समारंभ इ. ठिकाणी हजर राहण्याचे टाळते, तणावापासुन मुक्ती मिळण्यासाठी व्यसनाधीन होण्याचा चुकीचा मार्ग निवडते. जर अशा व्यक्तींना सावरले नाही तर त्या व्यसनाच्या दृष्ट चक्रात अडकून पडतात.
व्यसन हे इतर आजारांप्रमाणे एक आजार आहे. इतर आजार हा फक्त शारिरीक कमतरता कमी करतो पण व्यसन हे शारीरिक व मानसिक दोन्ही गोष्टींवर परिणाम करतो. त्यामुळे सदर व्यक्तीचे जसजसे व्यसन वाढते तसतसे त्या व्यक्तीला आयुष्य जगणे कठीण होत जाते.
अशा व्यक्तीला वरील आजारातुन लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करणे आवश्यक असते. कारण तेथे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक दोन्ही गोष्टीवर उपचार केले जातात. तेथे मानसरोग तज्ञ, स्वयंसेवक, तज्ञ डाॅक्टर असल्यामूळे त्या व्यक्ती लवकर सावरु शकतात.
व्यसनमुक्ती केंद्र काळाची गरज-:
व्यसनाधिनता हि समाजाला लागलेली एक किड आहे आणि जर ही किड नष्ट करावयाची असेल तर व्यसनी व्यक्तीला योग्य प्रकारचे उपचार मिळाले पाहिजेत जे व्यसनमुक्ती केंद्रात दिले जातात. कुटुंबात तसेच समाजात अशा व्यक्तीला हिनतेची वागणूक मिळते प्रेमाअभावी अथवा आपल्याच माणसांच्या दुराव्यामुळे व्यक्तीची इच्छा असुनही ती या व्यसनापासुन स्वतःला लांब ठेवु शकत नाही. तर उलट ती दिवसेंदिवस व्यसनाच्या मगर मिठठीत अडकते. परंतु अशा व्यक्तींना जर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले तर त्याला केंद्र त्याच्या गुणदोषांसहीत स्विकारते त्याच्याशी कंेद्रातील कर्मचारी प्रेमाणे, आपुलकीने वागतात त्याच्या समस्या जाणून घेवुन त्यातुन बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवितात. सदर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनाधिन व्यक्तीच्या कुटंबाला देखिल समुपदेशीत ;कौन्सीलींगद्ध केले जाते. त्यांच्या समस्या जाणून घेवुन व्यसनाधीन व्यक्ती व कुटंब यांच्या विचारांच्या वाटाघाटी करुन हया समस्या सोडविल्या जातात.
सदर व्यक्ती स्वतःहुन, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या प्रयत्नाने के्रदात दाखल होत असतात. काही व्यक्तींना केंद्रातील वातावरण मनाविरुध्द वाटते. परंतु केंद्रातील कर्मचा-याच्या प्रयत्नामुळे त्या थोडया दिवसात सावरतात व मानसिक, शारिरीक उपचार घेण्यास तयार होतात. व्यसनमुक्ती केंद्रात त्यांची मानसिक, शारिरीक काळजी घेतली जाते. कारण केंद्रात दाखल झाल्यानंतर व्यसन पुर्णपणे बंद केले जाते त्यामुळे त्या व्यक्ती काही वेळा अस्वस्थ होतात अशा वेळेस तज्ञ डाॅक्टरांची मदत घेवुन त्यांच्यावर मानसिक उपचार तसेच औषधोपचार केले जातात.
व्यसनाधिनतेवर कोणतेही रामबाण औषध नसले तरी व्यसनमुकती केंद्रात भरती झाल्यामुळे अचानक बंद झालेल्या व्यसनानंतर होणारा त्रास सहन करण्यास एक मानसिक आधार मिळतो व शारिरीक वेदना कमी करण्यासाठी आणि शारिरीक झीज भरुन काढण्यासाठी वैदयकिय उपचार करण्यात येतात. शारिरीक, मानसिक, आर्थिक, व्यवसायिक, कौटुंबिक वैवाहीक, सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक इ. समस्या सोडविण्यासाठी समुपदेशकांची मदत घेवुन सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. समुपदेशानामुळे व्यक्तीस योग्य दिशा मिळून त्याचे जीवन सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचा केंद्र बिंदू व्यसनी व्यक्ती असली तरी आत्मा समुपदेशक आहे.
व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार पध्दती-:
व्यसनमुक्ती केंद्रात वैदयकिय, मानसिक आणि शारिरीक उपचार पध्दतंीचा अवलंब केला जातेा.
1. वैदयकिय उपचार पध्दती:-
हया उपचार पध्दतीमध्ये इंडियन मंेडीकल कौन्सिल द्वारे मान्यताप्राप्त औषधीचा वापर केला जातेा. उपचारादरम्यान अनेक उपाय योजना केल्या जातात. सदर औषधांनी सदर व्यक्तीच्या शरिरातील आमली पदार्थाचे उदा.अल्कोहोल/निकोटीन इ. यांचा प्रभाव कमी करण्यासाठी औषधेापचार करण्यात येतात याला क्मजमगपपिबंजपवद असे म्हणतात. तर विशिष्ट कालावधीनंतर व्यक्ती पुन्हा पुन्हा व्यसनाकडे आकर्षित होते त्याला Detexification म्हणतात. यासाठी देखील औषधोपचार केले जातात. म्हणजेच शरिराची झालेली झिज भरुन काढण्यासाठी औषधेापचार केले जातात. जेणेकरुन सदर व्यक्ती पुर्णपणे बरी होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
2. मानसिक उपचार पध्दतीः-
या पध्दतीमध्ये रुग्णावर मानसोपचार तज्ञांद्वारे उपचार केले जातात. . हया पध्दतीत रुग्णचे मनोबल वाढविले जाते. जेणेकरुन रुग्ण पुढील आयुष्य निरव्यसनी जगु शकेल याचा प्रयत्न केला जातो. काहीवेळेस मानसिक दुर्बलला निर्माण होउून व्यसनी व्यक्ती मानसिक रुग्ण बनते अशावेळी मानोसपचार तज्ञांच्या मदतीने औषधेापचार करुन व समुपदेशनाद्वारे उपचार करण्यात येतात.
3. शारिरीक उपचार पध्दती
हया उपचार पध्दतीत रुग्णांना योगासणे प्राणायाम, शारिरीक व्यायाम, वगैरे पध्दतींचा अवलंब करुन हा उपचार करण्यात येतो जेणेकरुन शरिर आणि मन दोघांचे स्वास्थ्य आबादीत राखण्यास मदत मिळते आणि व्यक्ती प्रफुल्लीत राहणे दिनचर्या सुयोग्य पध्दतीने पार पडते कामाची गुणवत्ता आणि दर्जा राखला जातो.
अशाप्रकारे व्यक्तींच्या सर्वागीण विकासासाठी उपचार करण्यात येतात. आणि व्यक्तीच्या आयुष्यातुन व्यसनाचे नामोनिशान मिटवून सुखी संसाराची सुरेख गाडी धावपटटीवर धावायला लागते.
यसनमुक्ती केंद्राकडे बघण्याचा दृष्टीकेान:-
व्यसनमुक्ती केंद्र म्हटले की व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन सोडवण्याची जागा ;दवाखाना द्ध एवढीच काय ती व्यसनमुक्ती केंद्राची ओळख असते. परंतु परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राने त्यांच्याही पुढे जावुन व्यसनी व्यक्तीला व्यसनापासुन दुर करण्याबरोबरच त्याच्या संसाराची घडी व्यवस्थीत बसवून त्याला समाजात त्याचे असलले स्थान पुन्हा पुर्ववत मिळवून देण्यास मदत करते. याच बरोबरीने व्यसनी व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुप्त गुणांची पारख करुन त्याला त्याची जाणीच करुन देवून त्याचा उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन कंेद्रातून मिळते.
व्यसनमुक्तीची लढाई ही व्यसनी व्यक्तीच्या विरोधात नसून त्याला जडलेल्या व्यसनाच्या विरोधात आहे असे समजून त्याच्या संपुर्ण कुटंबात कुठल्याही प्रसंगात समर्थपणे सामोरे जाण्याचे मार्गदर्शन परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राद्वारे करता येते. थोडक्यात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामार्फत ख-या अर्थाने ‘‘परिवर्तन‘‘ या नावाचा सार्थक करण्यात येतो. व्यसनमुक्तीची चळवळ ही सामाजिक बांधीलकी या नात्याने कार्यकरण्याचे काम परिवर्तन केंद्रामार्फत करण्यात येते.
करण्यात येणा-या शारिरीक तपासण्या:-
अल्कोहोल/आमली पदार्थाच्या सेवनाने शरिरावर दुष्परिणाम होतात त्यात लिव्हर, किडणी, हृदय, फुफुस, मंेदु यासारख्या श्रिरातील महत्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होतो. हया शारिरीक दुष्परिणामांची ओळख होण्यासाठी HB, CBC, LFT, KFT, ECG, BSL, USG, ABDOMEN अशा काही तपासण्या कराव्या लागतात. हया तपासण्यांच्या निष्कर्षावरुन रुग्णांची व्यसनाधिनतेची ओढ कमी करण्यासाठी व शारिरीक स्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना आखली जाते.
अल्कोहोलीक अॅनोमिनस ;ए.ए.द्ध
अल्कोहोलीक अॅनोमिनस ही जगातील स्व-मदत संघटना आहे. हया संघटनेचे सदस्य हे स्वतः अल्कोहोलपासुन लांब असतात आणि व्यसनमुक्ती जीवन जगतांनाचे आणि पुर्वायुष्यातील अनुभवाचे कथन करतात. त्यांच्या अनुभव कथनामुळे व्यसनी व्यक्तीनंाही व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते.
या संघटनेचे सदस्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर आपण जसे या आजाराला काबुत करायला शिकलो तसे इतरांनी ही शिकाव यासाठी सर्व सदस्य सतत प्रयत्नशील असतात. या संघटनेत सभासदांची इच्छा असली पाहीजे.
सेाबरायटी / सोबर राहणे म्हणजे काय?:-
व्यसनमुक्त जीवन जगणे म्हणजेच सोबर राहणे आपण व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे व्यसनाचा आजार आपल्याला जडलेला आहे आणि इतर आजारांप्रमाणेच यावरही औषधोपचार घेउन यातुन बरे/मुक्त होता येते हे लक्षात घेउन औषधोपचार घेउन व्यसनापासुन लांब रहाणे म्हणजेच सोबर राहणे होय. सोबर राहुन व्यक्ती व्यसनमुक्त जीवनाचा मनमुराद आनंद लुटू शकते.
Office Location
परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र,
प्लॉट नं. ३०, गायत्री नगर दत्त मंदिर चौक,
देवपूर धुळे-424005